Last Updated: Sunday, October 23, 2011, 03:45

झी २४ तास वेब टीम, अकोला
अकोला महानगरपालिका बरखास्त करण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलाय. आर्थिक गैरव्यवहारांमुळं हा निर्णय घेण्यात आला आहे.
गैरव्यवहारांमुळं याठिकाणी कोणताही प्रशासकीय अधिकारी जायला तयार होत नसे. तसंच उत्पानाच्या साधनांची कमतरता असल्यामुळे पालिका आर्थिक डबघाईला आली होती. जकात, पाणीपट्टी वसूल होत नसे. परिणामी मुख्यमंत्र्यांनी पालिका कर्मचा-यांच्या वेतनापोटी १३ कोटी रुपये पालिकेला दिले होते.
२००६ पासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता पालिकेवर आहे. पालिका बरखास्त झाल्याची अधिकृत घोषणा सोमवारी होणाराय.
First Published: Sunday, October 23, 2011, 03:45