नव तंत्रज्ञानासाठी शेतकरी 'शिवारफेरी' - Marathi News 24taas.com

नव तंत्रज्ञानासाठी शेतकरी 'शिवारफेरी'

झी २४ तास वेब टीम, अकोला
 
शेतक-यांपर्यंत नव तंत्रज्ञान पोहचण्याच्या दृष्टीने अकोल्यातल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तीन दिवस शिवारफेरीचं आयोजन केलं. शेतक-यांच्या समस्या सोडवण्याचाहि प्रयत्नही यावेळी विद्यापिठाने केल्याने शेतक-यांनी या शिवारफेरीला चांगला प्रतीसाद दिला.
अकोला जिल्ह्यातील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वर्धापानदिनानिमित्त शेतक-यांनकरिता शिवारफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं.. तीन दिवसाच्या या शिवारफेरीत विदर्भातील सर्वच अकरा जिल्ह्यातील ७०० शेतक-यांनी सहभाग घेतला. विद्यापिठांच्या स्टॉल्समधून शेतक-यांना वेगेवेगळ्या प्रकारची बियाणे आणि शास्त्रोक्त माहिती शेतक-यांना देण्यात आली.
 
४२ वर्षांत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठानं १०७० विषयावरंच तंत्रज्ञान विकसीत केलंय..तसेच १४०  नव्या वाणांचा समावेशही केलाय. विद्यापिठानं गेल्या वर्षभरात संशोधन क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. गव्हामध्ये पीकेव्ही वाशीम, एकेडब्ल्यू ४६२७, हरभ-यामध्ये पीकेव्ही  काबूली-४ आणि गुलाबी करडई,या वाणांचाही नव्यानं समावेश केलाय.याशिवाय नागपूर सीडलेस संत्रा आणि सिडलेस निंबू यासोबतच लिंबू यंत्राचा समावेश केलाय.
 
शिवारफेरीच्या माध्यमातून कृषी विद्यापिठांना शेतक-यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न यशस्वी होतांना दिसतो. मात्र शेतक-यांपर्यंत पोहचत असतांना शेतक-यांच्या प्रतीक्रिया विचारात घेउन उत्पादनवाढीसाठी यंत्र आणि तंत्राचा समन्वय साधारण अपेक्षीत आहे. यामुळे कृषि विद्यापिठांची विश्वाहर्ता टिकून राहण्यास नक्कीच मदत होईल.
 

First Published: Saturday, November 5, 2011, 13:24


comments powered by Disqus