Last Updated: Thursday, January 26, 2012, 20:18
www.24taas.com, चंद्रपूर 
चंद्रपूरच्या चांदा जंगलात एका वाघाची विजेचा शॉक देऊन शिकार केल्याची धक्कादाय़क घटना उघडकीस आली आहे. चांदा भागातील झरणच्या जंगलात एका वाघाचा कुजलेला मृतदेह आढळून आला. त्या वाघाभोवती हायवोल्टेज विद्युत वाहिनीचा फास आढळला. आधीच वाघाची संख्या दिवसेंदिवस घटत चालली असल्याने त्यांतच अशी घटना घडल्याने वन अधिकारी अधिकच चिंतेत पडले आहेत.
तीन ते चार दिवसांपूर्वी या वाघाची शिकार केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. ठार मारलेल्या वाघाची नखं आणि दात गायब करण्यात आले आहेत. कुऱ्हाडीनं हे अवयव कापून नेल्याचं प्राथमिक तपासणीत आढळून आल आहे.
हा फास हरण किंवा चितळ मारण्यासाठी लावण्यात आला असावा असा संशय व्यक्त केला जातो आहे. शिकारीसाठी इलेक्ट्रिक शॉकच्या नव्या तंत्राचा वापर सुरु असल्याचं या घटनेमुळं स्पष्ट झालं आहे. त्यामुळं शिकार कशी रोखायची असा प्रश्न वनाधिकाऱ्यांसमोर पडला आहे.
First Published: Thursday, January 26, 2012, 20:18