नक्षलवाद्यांकडून भामरागड सभापतींची हत्या - Marathi News 24taas.com

नक्षलवाद्यांकडून भामरागड सभापतींची हत्या


www.24taas.com ,गडचिरोली
 
गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा नक्षलवाद्यांनी धुडगूस घातला आहे.  भामरागड पंचायत समितीचे सभापती बहादुरशहा आलम यांची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकारामुळे नक्षलवादी पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
बहादुरशहा आलम यांची आज सकाळी  नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. आरेवाडा परिसरातून ते पंचायत समिती निवडणूक लढवीत होते. ते कॉंग्रेस पक्षाशी निगडित होते. त्यांच्या हत्येमागचे नेमके कारण अद्याप समजले नाही. मात्र, नक्षलवाद्यांनी का त्यांना टार्गेट केले याचा तपास घेण्यात येत आहे.  गेल्या काही दिवसांमध्ये  राजकीय नेत्याची हत्या होण्याची ही पहिलीच घटना आहे.

First Published: Saturday, January 28, 2012, 11:42


comments powered by Disqus