४८ तास इमारत अपघाताचे मदतकार्य सुरूच - Marathi News 24taas.com

४८ तास इमारत अपघाताचे मदतकार्य सुरूच

www.24taas.com, नागपूर
 
नागपूरच्या डिप्टीसिग्नल या भागात कोसळलेल्या इमारतीखाली अडकलेल्या  मजुरांना ४८ तासांनंतरही बाहेर काढण्यात अपयश आल आहे. बचाव दलाला अत्तापर्यंत ५ मजुरांचे मृतदेह बाहेर काढता आले आहेत. घटनास्थळाची पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी पाहणी केली आणि बचाव यंत्रणा अपुरी असल्याचं त्यांनी मान्य केलं.
 
पिडीतांनीही प्रशासना विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. पण सेनेनंही बचाव कार्यात मदतीला सुरूवात केली आहे. या सगळ्या घटनेसाठी दोषी असलेल्या प्रमोद खंडेलवालला पोलिसांनी अटक केली आहे. नागपूरच्या चिरवली ले आऊट परिसरात सात मजली इमारत कोसळली होती. कोल्ट स्टोरेजसाठी निर्माणाधीन असलेली ही इमारत कोसळल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक मेहनत करून मजूरांची सुटका केली. प्रमोद खंडेलवाल यांच्या मालकीची ही इमारत असून तिचं बांधकाम सुरू होतं.
 
दरम्यान, इमारतीच्या बांधकामाची आणि कोल्ड स्टोरेजची रितसर परवानगी घेतली होती, असं नागपूर सुधार प्रन्यास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं होतं. मरण पावलेल्या मजुरांची नावे संतराम भारती आणि दिलीप अशी आहेत.
 
 

First Published: Thursday, February 2, 2012, 12:54


comments powered by Disqus