Last Updated: Saturday, October 29, 2011, 11:54
झी २४ तास वेब टीम, नागपूर नागपूरात नामांकित ब्रँडचा बोगस झंडु बाम, चहापत्ती आणि डिटर्जंट बनवणा-या कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आला. त्या कारखान्यातून चार राज्यात बोगस माल वितरीत केला जात होता. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

हा कारखाना आणि इथला मालही तद्दन बोगस आहे. मात्र हा बोगस मालही अगदी हुबेहूब दिसणारा असाच तयार करण्यात . तुळशीनगरमधल्या बोगस कारखान्याचा पर्दाफाश करून पोलिसांनी हा सर्व नकली माल हस्तगत केला आहे. या बोगस मालामुळे आरोग्यास फार मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
येथील जागरूक नागरिकांनी या कारखान्यावर पाळत ठेवली होती. त्यांच्या बोगसपणाची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांना ही माहिती देण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याला अपायकारक ठरणारा हा कारखाना जागरूकतेमुळं उद्धवस्त करण्यात यश आलं आहे.
या कारखान्याची व्याप्ती आणि त्यातल्या कमाईत अनेकांचे हात असण्याची शक्यता आहे. त्यामुळं आगामी काळात अनेकांच्या चेह-यावरील बुरखा टराटरा फाटणार हे आता स्पष्ट झालं आहे.
First Published: Saturday, October 29, 2011, 11:54