Last Updated: Friday, February 3, 2012, 12:17
www.24taas.com, चंद्रपूर महाराष्ट्र राज्याचा सुवर्ण महोत्सव आणि चंद्रपूर शहराची पंचशताब्दी या पार्श्वभूमीवर ८५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उदघाटन आज होतंय.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरीत होत असलेल्या या संमेलनाचं उदघाटन माजी न्यायमूर्ती आणि विचारवंत चंद्रशेखर धर्माधिकरी यांच्या हस्ते होणार आहे. संमेलन रविवारपर्यंत चालणार आहे. या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
उदघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कवी प्रा. वसंत आबाजी डहाके राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. महिपसिंग यांची उपस्थिती राहिल. सकाळी ग्रंथदींडी निघणार आहे. 'नक्षलवाद', 'लोप पावत चाललेली आदिवासी संस्कृती आणि मराठी साहित्य' यावर परिसंवाद होईल. याशिवाय इतरही अनेक विषयांवर दोन दिवस परिसंवाद पार पडतील. समारोपीय कार्यक्रमात पं. हदयनाथ मंगेशकर यांचा सत्कार होणार आहे.
First Published: Friday, February 3, 2012, 12:17