Last Updated: Monday, February 6, 2012, 13:26
www.24taas.com, चंद्रपूर 
चंद्रपुरातल्या 85 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात विक्रमी पुस्तक विक्री झाली. संमेलनात तब्बल तीन कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. संमेलनाच्या पहिल्या दिवसापासून संमेलनास्थळी सुरु झालेल्या साहित्यप्रेमींचा ओघ अखेरच्या दिवसापर्यंत कायम होता. सुरुवातली संमेलनात 100 गाळे तयार करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला होता. मात्र प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून गाळ्यांटी संख्या अडीचशे पर्यंत वाढवण्यात आली.
ग्रंथप्रदर्शनात सर्वाधिक संख्या मराठी पुस्तकांची होती. यांत जवळपास 35 लाख पुस्तकं विक्री साठी ठेवण्यात आली होती. यांत सानेगुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकाची सर्वाधिक विक्री झाली. नामवंत लेखकांच्या अडीचशे पुस्तकांना चांगली मागणी होती. याशिवाय स्पर्धा परीक्षा, मुलांसाठीची पुस्तके यांचीही चांगली विक्री झाल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आलंय. संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या पुस्तकांनाही साहित्यप्रेमींचा भरघोस प्रतिसाद मिळाला. साहित्यप्रेमींच्या या प्रतिसादामुळे दुर्गम भागात पुस्तक विक्री होत नाही हा अंदाज चुकीचा ठरला आहे.
First Published: Monday, February 6, 2012, 13:26