निवडणुकीतल्या प्रचारासाठी काँग्रेसचे क्लासेस ! - Marathi News 24taas.com

निवडणुकीतल्या प्रचारासाठी काँग्रेसचे क्लासेस !

अखिलेश हळवे, www.24taas.com, नागपूर
 
निवडणुक जिंकण्यासाठी उमेदवार किंवा राजकीय पक्ष प्रचारात कुठलीच कसर ठेवत नाहीत. नागपुरमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना नेत्यांनी प्रचाराच्या टीप्स दिल्या.
 
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी उमेदवार आणि कार्यकर्त्यांसाठी क्लासेस घेतले. विजयासाठी कशाप्रकारे व्यूहरचना करायची याचं मार्गदर्शन सर्वच नेत्यांनी केलं. विलास मुत्तेमवार यांनी तर अत्यंत लहान-सहान गोष्टींकडं लक्ष देण्याचं सांगत मतदारांचे पाय धरण्याचा सल्लाही उमेदवारांना दिला.
 
आता नेत्यांचा क्लास आणि निवडणुकीसारखी परीक्षा म्हटल्यावर धडा घेणार नाहीत ते उमेदवार कसले! त्यांनीही नेत्यांचा गुरूमंत्र शिरसावंद्य मानत प्रचाराची आखणी करण्याचा निश्चिय केला. केवळ निवडणुकीपुरताच नाही तर निवडणुकीनंतरही एवढी तत्परता आणि लोक संपर्क ठेवला तर उमेदवारांचं आणि जनतेचंही भलं होईल हे नक्की.
 

First Published: Friday, February 10, 2012, 16:17


comments powered by Disqus