Last Updated: Sunday, February 12, 2012, 13:50
www.24taas.com, अमरावती अमरावतीमध्ये पोलिस नाकाबंदीत फोर्ड एन्डेव्हर गाडीतून एक कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. अमरावती महापालिकेच्या निवडणुकीसाठी या पैशांचा वापर होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
अमरावतीमधील गाडगेनगर पोलिसांनी ही कारवाई केली. या गाडीचा क्रमांक MH-31-BC-4744 आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेतलं आहे.
First Published: Sunday, February 12, 2012, 13:50