झी 24 तास भंडारा प्रतिनिधी कांचन देशपांडे यांचं निधन - Marathi News 24taas.com

झी 24 तास भंडारा प्रतिनिधी कांचन देशपांडे यांचं निधन

झी २४ तास वेब टीम, भंडारा
 

झी 24 तासचे भंडारा-गोंदिया प्रतिनिधी आणि पत्रकार कांचन देशपांडे यांचं ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते 43 वर्षांचे होते. नागपुरातील त्यांच्या राहत्या घरी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. उपचार सुरु असतानाच आलेल्या ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालं.
 
गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून ते सक्रीय पत्रकार म्हणून काम करीत होते. दैनिक तरुण भारत पासून त्यांनी पत्रकारितेच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर ईटीव्ही मराठी आणि झी 24 तासचे भंडारा-गोंदियाचे प्रतिनिधी अशी त्यांची कारकीर्द होती. भंडा-यातील खैरलांजी हत्याकांड उघडकीस आणण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. याशिवाय भंडारा-गोंदियातील नक्षली कारवायांचंही त्यांनी निर्भिडपणे वृत्तांकन केलं होतं. ग्रामीण भागातील अनेक महत्वाचे प्रश्न त्यांनी हिरीरीनं मांडले. कृषी क्षेत्राशी त्यांची विशेष जवळीक होती.

First Published: Wednesday, November 2, 2011, 06:11


comments powered by Disqus