वटसेव पुरस्कार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला - Marathi News 24taas.com

वटसेव पुरस्कार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला

झी 24 तास वेब टीम, अकोला
 
आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचा समजला जाणारा पाणी व्यवस्थापनातील आंतरराष्ट्रीय सिंचन आणि निचरा परिषदेचा वटसेव पुरस्कार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला प्राप्त झाला. विदर्भातील कृषी विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेला मोठा गौरव असल्याचं मानलं जातं.
 
तेहरान इथं आयोजीत आंतराष्ट्रीय सिंचन आणि निचरा परिषदेच्या 62 व्या कार्यकारिणी सभेत कुलगुरु डॉ.व्यंकटराव मायंदे आणि डॉ.सुभाष टाले यांना हा पुरस्कार देउन गौरविण्यात आलं. जगभरातून 42 प्रस्तावांमधून दोन प्रस्ताव निवडले होते. अंतिम चाचणीत चीनच्या तुलनेत भारताचा प्रस्ताव उत्कृष्ट ठरला.
 
अकोला,अमरावती,यवतमाळ,बुलढाणा,वाशीम आणि वर्धा या जिल्ह्यातील 63 गावातील 600 शेतक-यांचा सहभाग नोंदवून. जलसंधारण क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणल्याचं समोर आलं. समतल बांध,समतल चर, रानबांधणीच्या पद्धती,उताराला आडवी पेरणी यासारख्या पायाभूत आणि सोप्या पध्दततीतून शेतक-यांना पाणी जिरवण्याचे धडे देण्यात आले. गेल्या चार वर्षापूर्वी हा पुरस्कार राज्यातील नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील भरत कवले यांच्या परिवर्तन पाणीवापर संस्थेला मिळाला होता. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हा पुरस्कार मिळविणारे देशातील पहिलं विद्यापीठ ठरलंय.

First Published: Friday, November 4, 2011, 11:28


comments powered by Disqus