बाळसाहेबांपर्यंत फोन पोहचत नाहीः गडकरी - Marathi News 24taas.com

बाळसाहेबांपर्यंत फोन पोहचत नाहीः गडकरी

www.24taas.com, नागपूर
 
 
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या भावनेविषयी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. सेनाप्रमुखांना फोन केला तर त्यांच्या पर्यंत तो पोहचत नाही असा खळबळजनक गौप्यस्फोट झी २४ तासचे बातमीदार अखिलेश हळवे यांच्याशी बोलताना  नितीन गडकरींनी केला.
 
 
सामनाचे संपादक संजय राऊत हे सातत्याने ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, गोपीनाथ मुंडे, मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि माझ्याबद्दल सातत्याने टीका करतात. तसंच लिखाणाचा स्तरही चांगला नसतो. भविष्यात शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमधील संबंध चांगले राहावेत असं वाटत असल्यास संजय राऊत यांनी याचा विचार करावा.
 
 
सामनातील लिखाणामुळे युतीत कटुता निर्माण झाली असल्याची टीका गडकरींनी केली आहे. राऊतांनी असले लिखाण करुन संबंध बिघडवू नयेत असं गडकरी म्हणाले. सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल अटलबिहारी वाजपेयीं इतकाच आदर माझ्या मनात असल्याचं गडकरींनी सांगितलं. दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी झी २४ तासला दिलेल्या खास मुलाखतीत भाजपची नवी पिढी अतिशहाणी असल्याची टिप्पणी केली होती.
 

 

First Published: Thursday, February 23, 2012, 16:28


comments powered by Disqus