नागपूर शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर - Marathi News 24taas.com

नागपूर शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर

www.24taas.com, नागपूर
 
महापालिका निवडणुकांनंतर नागपूर शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना जिल्हाध्यक्ष शेखर सावरबांधे आणि शहराध्यक्ष सूरज गोजे यांच्यात हाणामारी झाली आहे.
 
यावेळी शिवसेनेच्या ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. निवडणुकांमध्ये चुकीच्या पद्धतीने तिकीट वाटपप्रकरणावरुन हे मारहाण झाल्याचं सांगण्यात येत आहे. या मारहाणीत सूरज गोजे जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी शेखर सावरबांधे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
 
दरम्यान या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

First Published: Tuesday, February 28, 2012, 09:57


comments powered by Disqus