Last Updated: Sunday, October 2, 2011, 14:31
झी २४ तास, वेब टीम- नागपूर आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आज नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. पुढील महिन्यात अडवाणी भ्रष्टाचार विरोधात रथयात्रा काढणार असून त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि इतर पदाधिकाऱ्यांना भेटले.
भ्रष्टाचारमुक्त व्यवस्थेसाठी ही रथयात्रा आयोजित करण्यात येणार असून त्यासाठी ईशान्य भारतातही जाण्याचा मनोदय अडवाणींनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
First Published: Sunday, October 2, 2011, 14:31