खंडणीप्रकरणी तिघांना अटक - Marathi News 24taas.com

खंडणीप्रकरणी तिघांना अटक

www.24taas.com, बुलढाणा 
 
 
चिखलीमधून प्रसिद्ध होणा-या साप्ताहिक विदर्भ वंदनच्या मुख्य संपादक, मंहेश गोंधने, कार्यकारी संपादक विजय गोंधने यांना खंडणी मागितल्या प्रकरणी रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
 
चिखलीचे काँग्रेसचे आमदार राहूल बोंद्रे यांच्याविरूद्ध विदर्भ वंदनमधून बदनामीकारक वृत्त सातत्यानं दिली जात होती. हा प्रकार एवढ्यावरच न थांबता राहुल बोंद्रेंच्या वडिलांबाबतही बदनामीकारक लिखाण केलं जात होतं. त्याचबरोबर गोंधाने बंधूंनी आमदार राहुल बोंद्रेविरूद्ध निवडणुकीत खोटं शपथपत्र दाखल केलं होते.
 
मात्र हि बाब थांबवावी यासाठी आमदारांच्या समर्थकांनी गोंधने बंधूंना तीन महिन्या अगोदर विनंती केली होती. त्यावेळी त्यांनी 50 लाख रूपयांची मागणी राहूल बोंद्रेंना केली होती. मागणीची रक्कम कमी करत अखेर 15 लाखांवर तंटा सोडवण्यात आला. हि रक्कम घेण्यासाठी महेश गोंधने, विजय गोंधने, मनसे शेतकरी सेल जिल्हा संघटक शैलेश गोंधने आणि त्यांचे मामा प्रतापसींग मलय हे आले असताना बुलढाणा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिका-यांनी त्यांना रंगेहाथ पकडून अटक केली.
 
व्हिडिओ पाहा..

First Published: Thursday, March 1, 2012, 09:26


comments powered by Disqus