किटाळी गावात वाघाचा मृत्यू - Marathi News 24taas.com

किटाळी गावात वाघाचा मृत्यू

www.24taas.com,मुंबई
 
 
चंद्रपूरजवळच्या किटाळी गावात एका वाघाचा मृत्यू झाला आहे. पूर्ण वाढीच्या एका वाघाचा मृत्यू झाल्याची बाब गस्तीवर असणा-या कनिष्ठ वन कर्मचा-यांच्या लक्षात आली.
 
 
या वाघाचे सर्व अवयव शाबूत आहेत. मात्र पाणवठ्यावर ही घटना घडल्यामुळं संशय व्यक्त केला जातो आहे. वाघाचा मृत्यू वृद्धापकाळानं झाल्याचा निष्कर्ष वनविभागानं काढला आहे. 2012 या नव्या वर्षात वाघाचा मृत्यू होण्याची ही तिसरी घटना आहे. मंगळवारी माकडाचा पाठलाग करताना भरधाव ट्रेनची धडक लागून बिबट्या गंभीर जखमी झाला होता. सिंदेवाहीपासून दोन किलोमीटरच्या अंतरावर ही घटना घडली होती. या वाघावर नागपुरातील महाराजाबाग पशु सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

First Published: Friday, March 2, 2012, 09:11


comments powered by Disqus