Last Updated: Friday, March 2, 2012, 14:21
www.24taas.com,चंद्रपूर 
चंद्रपुरातील दहावीच्या ३५ विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेलं आहे. इथल्या सेंट मायकेल्स इंग्लिश स्कूलनं सीबीएसई बोर्डाची मान्यता नसतानाही ३५ विद्यार्थ्यांची दिशाभूल करत प्रवेश दिला.
मात्र आज परीक्षा सुरु होत असतानाही विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र मिळालं नसल्यानं शाळेचा भांडं फुटलं. विद्यार्थी आणि पालकांनी शाळेच्या या बनवाबनवीच्या निषेधार्थ रात्रभर ठिय्या आंदोलन केलं. मात्र या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेल्यानं पालक आणि विद्यार्थी संतप्त झाले आहेत.
मागील वर्षी सेंट मायकेल्स स्कूलनं शहरातल्या दुसऱ्या एका शाळेशी सेटींग करुन आपले विद्यार्थी परीक्षेला बसवले होते. मात्र यावर्षी स्कूल व्यवस्थापनानं नागपुरच्या शंतनू शाह नावाच्या एका मध्यस्थाला हाताशी धरुन मुलांचे प्रवेश अर्ज आणि कागदपत्रे CBSE ला दिले होते. शाळेच्या अशा बनवाबनवी मुळे मुलांच्या एक वर्ष मात्र वाया गेलं आहे.
First Published: Friday, March 2, 2012, 14:21