नागपुरच्या महापौरपदी अनिल सोले - Marathi News 24taas.com

नागपुरच्या महापौरपदी अनिल सोले

www.24taas.com, नागपूर
 
नागपुरच्या महापौरपदी भाजपच्या अनिल सोलेंची निवड झाली. अनिल सोले ३४ मतांनी विजयी. सोलेंना एकूण ८६ मते मिळाली. बसपाच्या किशोर गजभिये यांना अनिल सोलेंनी पराभूत केलं. निवडणुकीत राष्ट्रवादीने तटस्थ भूमिका घेतली.
 
भाजपचे संदीप जाधव उपमहापौरपदी निवडून आले आहेत. संदीप जाधव यांनी बसपाच्या शबानांचा २८ मतांनी पराभव केला. संदीप जाधव यांना ८६ मते मिळाली. नागपूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांवर भाजप उमेदवार विजयी झाले आहेत.
 
अनिल सोले हे भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष आहेत. तसंच ते नागपुरातील टीम गडकरीचे महत्वाचं सदस्य आहेत. सोले हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचे खंदे आणि अत्यंत विश्वासू समर्थक मानले जातात. सोले हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मुशीर तयार झालेलं व्यक्तिमत्व आहे.
 

First Published: Monday, March 5, 2012, 13:08


comments powered by Disqus