कापूस निर्यातबंदी, शेतकऱ्यांचे आंदोलन - Marathi News 24taas.com

कापूस निर्यातबंदी, शेतकऱ्यांचे आंदोलन

राजेश सोनोने, www.24taas.com,अमरावती 
 
केंद्राने कापूस निर्यातीवर बंदी घातल्यानं त्यावर आता तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विविध शेतकरी संघटना निर्यातबंदीविरोधात आक्रमक झाल्या आहेत.
 
कापूस निर्यातबंदीचा अमरावतीमध्ये असा निषेध करण्यात आला. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कापूस टाकला तसंच कार्यालयाबाहेर कापूस जाळला. विदर्भातला शेतकरी आधीच अडचणीत असताना या कापूस निर्यातबंदीमुळं तो अधिकच अडचणीत आला आहे.
 
तर सरकार जर कापसावर निर्यातबंदी घालत असले तर अफूच्या शेतीला परवानगी द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेनं केली आहे.  या मागणीसाठी येत्या १९ तारखेला शेतकरी संघटना पुणे कृषी आयुक्तालयावर मोर्चा काढणार आहे. कापसावरून आगामी काळात आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. सरकार  निर्यात बंदीचा फेरविचार करतं का ते पहावं लागेल.

First Published: Wednesday, March 7, 2012, 16:57


comments powered by Disqus