गडकरींच्या मदतीला कलावतींचा नकार - Marathi News 24taas.com

गडकरींच्या मदतीला कलावतींचा नकार

झी २४ तास वेब टीम, यवतमाळ
 
काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांनी भेट दिल्यानंतर प्रकाशझोतात आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकरी विधवा कलावती बांदुरकर यांना आता भजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी १लाख रुपयांची मदत जाहीर केली. मात्र कलावतींनी ही मदत नाकारलीय.
 
कलावतींचे जावई आणि त्यांची दुसरी मुलगी सविता खामणकरनं दारिद्र्याला कंटाळून आत्महत्या केलीय. सविताचा मुलगा कलावतींकडेच आहे. या घटनेनंतर गडकरींनी कलावतींना मदत देऊ केली. मात्र याआधी आपल्याला राहुल गांधीमुळे बिंदेश्वर पाठकांकडून जी मदत मिळाली त्यात आपण सुखी असून ही मदत आपल्या नातवंडांना द्यावी. तसंच इतर शेतकरी विधवांना गडकरी यांनी मदत करावी असं आवाहन कलावतींनी केलंय.

First Published: Thursday, November 10, 2011, 06:26


comments powered by Disqus