अकोल्यात अर्भकाच्या वाट्यास नरक याताना - Marathi News 24taas.com

अकोल्यात अर्भकाच्या वाट्यास नरक याताना

Tag:  
  www.24taas.com, अकोला
 
अकोल्यातल्या जिल्हा सरकारी रुग्णालयात स्त्री अर्भकाचे कुत्र्याने लचके तोडल्याची हृदयद्रावक घटना घडलीय. तीन ते चार कुत्र्यांनी झुडपात अर्भकाचे लचके तोडले. हे अर्भक हॉस्पिटलमध्ये कुणीतरी आणुन ठेवले असल्याचा संशय आहे. सुरक्षारक्षकांचा राबता असलेल्या या ठिकाणी अशी घटना घडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
 
पुरोगामी समजल्या जाणा-या महाराष्ट्रात अजुनही मुलीबाबत मानसिकता बदललेली नाही याचं हृदयद्रावक उदाहरण अकोल्यात घडलं. अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात कुणीतरी स्त्री अर्भक आणून सोडलं होतं. त्याचे कुत्र्यांनी लचके तोडले. अतिशय वर्दळ असलेल्या ठिकाणी ही घटना घडल्यानं रुग्णालय प्रशासनाची बेफिकीरी उघड झाली आहे. पोस्ट मार्टेम रिपोर्ट आल्यावरच याबाबत अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. गरज भासल्यास डी.एन.ए चाचणीही घेतलीही जाण्याची शक्यता आहे.
 
काही दिवसांपुर्वीच महिला दिन साजरा झाला. मात्र अजुनही मानसिकता बदलत नाही असं चित्र आहे. मुलगी झाली म्हणून अर्भक रुग्णालयात सोडणा-याला जरब अशी शिक्षा झाली तर अशा प्रकारांना आळा बसेल.
 

 
 

First Published: Sunday, March 11, 2012, 16:28


comments powered by Disqus