शेतकऱ्यांचं आत्महत्त्या सत्र सुरूच - Marathi News 24taas.com

शेतकऱ्यांचं आत्महत्त्या सत्र सुरूच

झी २४ तास वेब टीम, नागपूर
 
विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरुच आहे. गेल्या ७२ तासांमध्ये पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून वर्धा, अमरावती, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
 
मारुती माटे, कचरुबा मेरट, महादेव घेसोडे, शंकर काळे आणि राजेंद्र त्योहारी अशी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावं आहेत. विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करुनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात सरकारला यश आलेलं नाही, हेच यावरुन स्पष्ट होतंय.

First Published: Friday, November 11, 2011, 13:38


comments powered by Disqus