Last Updated: Tuesday, March 13, 2012, 16:18
www.24taas.com, मुंबईपाच महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम आज राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन यांनी जाहीर केला आहे. भिवंडी, परभणी, लातूर, मालेगाव आणि चंद्रपूर या महापालिकांसाठी पंधरा एप्रिलला मतदान होणार आहे. तर १६ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी मंगळवारी रात्रीपासून आचारसंहिता लागू होणार आहे.
या पाच महापालिकांमध्ये मराठवाड्यातील लातूर आणि परभणी तर विदर्भातील चंद्रपूर या नव्याने बनलेल्या महापालिकांचा आणि भिवंडी, मालेगाव या महापालिकांचा समावेश आहे.
नुकत्याच झालेल्या दहा महापालिकांच्या निवडणुकांसाठीचं मतदान गुरुवारी १६ फेब्रुवारीला झालं होतं. त्यामुळं बऱ्याच नागरिकांना सुट्टी न मिळाल्यानं मतदानापासून ते वंचित राहिले होते. त्यामुळं मतदानातील टक्केवारी वाढविण्यासाठी या पाच महापालिकांसाठीचं मतदान रविवारी म्हणजेच १५ एप्रिलला सुट्टीच्या दिवशी घेण्यात येणार असल्याचं नीला सत्यनारायण यांनी सांगितलं..
पाच महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम:
२८ मार्च ते २८ मार्च उमेदवारी अर्ज स्वीकारणे२८ मार्च- उमेदवारी अर्जांची छाननी, आणि त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी जाहीर३० मार्च उमेदवारी अर्ज मागे घेणे.३१ मार्च चिन्हांचं वाटप२ एप्रिल अंतिम उमेदवार यादी आणि मतदान केंद्रांची यादी प्रसिद्धमतदान तारीख - १५ एप्रिलमतमोजणी - १६ एप्रिल
First Published: Tuesday, March 13, 2012, 16:18