Last Updated: Wednesday, March 21, 2012, 08:38
www.24taas.com, नागपूर 
नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाकरिता आज होणाऱ्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. वरकरणी भाजप-शिवसेनेकडे बहुमत असल्यामुळे त्यांची सत्ता येण्याची चिन्ह आहे.
मात्र कुठल्याही परिस्थितीत अध्यक्ष-उपाध्यक्षपद आपल्याकडे असावं यासाठी काँग्रेस नेते प्रयत्नरत आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणी काँग्रेस चमत्कार घडवतील अशी चर्चा आहे. ५९ सदस्य असलेल्या नागपूर जिल्हा परिषदेत भाजपचे २२, सेनेचे ८, काँग्रेस-१९ राष्ट्रवादी- ७ तर बीएसपी, आरपीआय आणि गोंडवाणा गणतंत्र पक्षाचे प्रत्येकी एक सदस्य आहेत.
महत्त्वाचं म्हणजे गोंडवाणा पक्षानं जरी युतीला समर्थन दिलं असलं तरीही सेनेची एक सदस्या काँग्रेसच्या संपर्कात असल्यानं त्याआधारेच काँग्रेस खेळी खेळण्याची शक्यता आहे.
First Published: Wednesday, March 21, 2012, 08:38