बजेटमधील दरवाढीला काँग्रेसचा विरोध - Marathi News 24taas.com

बजेटमधील दरवाढीला काँग्रेसचा विरोध

www.24taas.com, मुंबई
 
बजेटवरून विरोधकांनी सत्ताधा-यांना लक्ष केलं असताना आता सत्ताधारी काँग्रेसचे आमदारही बजेटवर नाराजी व्यक्त करू लागलेत.... विशेषतः स्वयंपाकाचा गॅस आणि सीएनजी महागल्यानं थेट सर्वसामान्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल, त्यामुळे काँग्रेसचे आमदार बजेटवर नाराज आहेत....
 
राष्ट्रवादीनं जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवल्यानं काँग्रेसही बजेटच्या निमित्तानं राष्ट्रवादीला खिंडीत गाठण्याची संधी सोडणार नाहीत अशी चिन्हं आहेत.... त्यातच दोन्ही पक्षांची चर्चा झाल्याशिवाय अंमलबजावणी होणार नाही, असं काँग्रेस नेते आणि सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितल्यानं काँग्रेस दरवाढीला विरोध करणार हे स्पष्ट झालं आहे..

First Published: Monday, March 26, 2012, 18:54


comments powered by Disqus