Last Updated: Tuesday, March 27, 2012, 20:26
www.24taas.com, नागपूर
कामं होत नसल्यानं संतप्त झालेल्या आमदारांनी गुप्त बैठक घेऊन मुख्यमंत्री हटाव मोहीम सक्रीय करण्याचं ठरवलंय. विदर्भातील काँग्रेसच्या १०-१२ आमदारांनी मुख्यमंत्री हटाव सुरु केलीय.
पक्षातील मरगळ दूर करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना हटवा अशी मागणी श्रेष्ठींकडे करण्याचं या आमदारांनी ठरवलंय.
महापालिका आणि झेडपी निवडणुकीत काँग्रेस पक्षाला फारसं यश मिळालं नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस मात्र दिवसेंदिवस काँग्रेसवर कुरघोडी करून डिवचते आहे. अशावेळी नेतृत्वाबद्दल आमदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हटाव मोहीमेनं पुन्हा उचल घेतलीय.
मात्र, ही मोहिम नेमकी कोणी सुरू केली. या मागील सूत्रधार कोण हे अद्याप समजू शकले नाही.
First Published: Tuesday, March 27, 2012, 20:26