Last Updated: Thursday, March 29, 2012, 12:28
www.24taas.com, मुंबई बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव-जामोद येथील मुकूल वासनिक कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीत शिकणाऱ्या ३८ विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. संस्थेच्या गलथानपणामुळे हे विद्यार्थी इंग्रजीचा पेपर देऊ शकले नव्हते.
या प्रकरणी आज विधानसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी गोंधळ घातला आणि दहा मिनिटासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी या विद्यार्थ्यांची परिक्षा परत घेतली जाईल असं आश्वासन दिल्याने या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही.
First Published: Thursday, March 29, 2012, 12:28