आमदार रवी राणांना आता सोबत पत्नीची - Marathi News 24taas.com

आमदार रवी राणांना आता सोबत पत्नीची

झी २४ तास वेब टीम, अमरावती
 
कापूस दरवाढीसाठी अमरावतीतले आमदार रवी राणा यांनी जेलमध्ये उपोषण सुरू केले असताना त्यांच्या पत्नी अभिनेत्री नवनीत कौर राणा यांनी जेलबाहेर उपोषण सुरु केलं. आमदार राणांचे उपोषण गेल्या दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावू लागली असून त्यांचं वजन किलोंनी घटलं. त्यांना बळजबरीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आमदार रवी राणा यांना १४ नोव्हेंबरला पोलिसांनी अटक केली होती, त्यांनी जामीन घेण्यास नकार देऊन कारागृहातच उपोषणाचा इशारा दिला होता.
 
आता त्यांच्या पत्नीही आंदोलनात उतरल्यात. नवनीत कौर राणा यांनी महिलांसह उपोषणाला सुरुवात केली. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला. कापूस दरवाढीसाठी अमरावतीतले आमदार रवी राणा यांनी जेलमध्ये उपोषण सुरू केले असताना त्यांच्या पत्नी अभिनेत्री नवनीत कौर राणा यांनी जेलबाहेर उपोषण सुरु केलं. आमदार राणांचे उपोषण गेल्या ४ दिवसांपासून सुरू आहे.
 
त्यामुळे  त्यांची प्रकृती खालावू लागली असून त्यांचं वजन १० किलोंनी घटलं. त्यांना बळजबरीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आमदार रवी राणा यांना १४ नोव्हेंबरला पोलिसांनी अटक केली होती, त्यांनी जामीन घेण्यास नकार देऊन कारागृहातच उपोषणाचा इशारा दिला होता. आता त्यांच्या पत्नीही आंदोलनात उतरल्यात. नवनीत कौर राणा यांनी १०० महिलांसह उपोषणाला सुरुवात केली. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला.

First Published: Friday, November 18, 2011, 08:31


comments powered by Disqus