Last Updated: Sunday, April 1, 2012, 11:07
www.24taas.com, मुंबई रामनवमीनिमित्त राज्यभरात भाविकांचा उत्साह दिसून येतोय. शिर्डी, नाशिकसह अनेक ठिकाणी आज रामनवमीनिमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईतही इस्कॉन मंदीरात भाविकांनी गर्दी केली होती. पालखी मिरवणूक काढण्यात आली. फुलांची खास सजावट करण्यात आली होती. आज दिवसभर विविध कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेत.
First Published: Sunday, April 1, 2012, 11:07