विदर्भ सिंचन महामंडळात ३००० कोटींचा भ्रष्टाचार - Marathi News 24taas.com

विदर्भ सिंचन महामंडळात ३००० कोटींचा भ्रष्टाचार

www.24taas.com,मुंबई
 
विदर्भ सिंचन विकास महामंडळात ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. विधानसभेत खडसेंनी हा गौप्यस्फोट केलाय. मेडगिरी समितीच्या अहवालात याबाबत सरकारवर ताशेरे ओढण्यात आलेत. मात्र, सरकार हा अहवाल दाबत असल्याचा आरोप खडसेंनी केलाय. तर समितीच्या अहवालानुसार कारवाई करू, असं आश्वासन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी दिलंय. निम्न वर्धा प्रकल्पावर ११०० कोटी रुपये खर्च झालेत. मात्र, एक एकरही जमीन सिंचनाखाली नाही, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
 
 
 
 
 
 
 
 

First Published: Monday, April 2, 2012, 13:50


comments powered by Disqus