वाशिममध्ये पुलाच्या पाईपमध्ये बिबट्या - Marathi News 24taas.com

वाशिममध्ये पुलाच्या पाईपमध्ये बिबट्या

www.24taas.com, वाशिम
 
अलीकडे बिबट्यानं मानवी वस्तीत प्रवेश करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. वाशिम जिल्ह्यातल्या भोयनी गावातही काल सकाळच्या सुमारास एक बिबट्या पुलाच्या पाईपमध्ये आढळून आला.
 
पाण्याच्या शोधात असलेला हा बिबट्या गावकऱ्यांना दिसताच एकच हाहाःकार उडाला. सैरभैर झालेल्या बिबट्यानं चाक जणांना जखमी केलं. गावभर हा बिबट्या धुमाकुळ घालत होता. अखेर पुन्हा पाईपमध्ये बिबट्या आल्यानंतर वनविभागानं त्याला शिताफीनं पिंजऱ्यात जेरबंद केलं. बिबट्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती त्यामुळं गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला.
 
अकोला वनविभागानं या बिबट्याला ताब्यात घेतलं असून लवकरच त्याला काटेपूर्ण अभयारण्यात सोडलं जाणार आहे.

First Published: Wednesday, April 4, 2012, 07:58


comments powered by Disqus