आर.आर.-देवेंद्र फडणवीस यांच्यात जुंपली - Marathi News 24taas.com

आर.आर.-देवेंद्र फडणवीस यांच्यात जुंपली

www.24taas.com, नागपूर
 
कॅग अहवाल फुटीप्रकरणी आर.आर.पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली आहे. कॅग अहवाल फुटीप्रकरणी माझी चौकशी काय करता, ज्यांनी घोटाळे केले त्यांची चौकशी करा, अशा शब्दात फडणवीसांनी आबांना थेट आव्हान दिले आहे.
 
 
कॅग अहवाल फुटीप्रकरणात CID चौकशी करणार असल्याचं राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी काल सांगितलं होतं. त्याला उत्तर देतांना आपण यापुढे विधानसभेत आणखी काही घोटाळे उघड करणार असल्याचा इशारा फडणवीस यांनी दिलाय. तर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी हा अहवाल केवळ प्रसिद्धीकरता फोडण्यात आला असल्याचं म्हंटल आहे.
 
 
दरम्यान भाजपचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनीही सरकावर टीकेची झोड उठवली आहे. कॅग अहवालावरून सरकार दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅगचा अहवाल फेटाळण्याच्या चर्चेवर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. एकीकडं 16 एप्रिलला अहवाल मांडण्याच्या गोष्टी करता आणि दुसरीकडं अहवाल फेटाळण्याच्या गोष्टी करता आणि कॅग अधिका-यांवर कारणे दाखवा नोटीसही बजावता. याबाबत सरकारनं नक्की भूमिका स्पष्ट करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.
 
 
संबंधित आणखी बातम्या
 

कॅग अहवाल : मंत्रिमंडळ बैठकीत गदारोळ

कॅग अहवाल : मंत्रिमंडळ बैठकीत गदारोळ
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत कॅगच्या अहवालावरुन गदारोळ झाला. कॅगचा अहवाल स्वीकारण्यास काही मंत्र्यांनी विरोध करत हा अहवाल राज्य सरकारनं फेटाळण्याची मागणी केली. मात्र यासंदर्भातील निर्णय आजच्या बैठकीत होऊ शकला नसला तरी. राज्याचे एडव्होकेट जनरल यांच्याकडं यावर मत मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

.








“मीच का दोषी?”- भुजबळ

मीच का दोषी?- भुजबळ
शिक्षण संस्थांना कमी किंमतीत भूखंड देण्याबाबत कॅगच्या अहवालात ताशेरे ओढण्यात आल्याने राज्यात अनेक मंत्री अडचणीत आले आहेत. याबाबतीत सर्वांना समान न्याय असताना मलाच का दोषी ठरवण्यात येतंय, असा प्रश्न छगन भुजबळांनी उपस्थित केलाय.

.


व्हिडिओ पाहा...







First Published: Friday, April 13, 2012, 16:18


comments powered by Disqus