Last Updated: Saturday, April 14, 2012, 16:28
www.24taas.com,एटापल्ली गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची हत्या केली. राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परीषद सदस्य केवल सावकार अतकमवार यांची भर चौकात गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
सहा ते दहा जणांच्या नक्षलवादी गटाने त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कोकुलवार आणि एक १४ वर्षीय मुलगा जखमी झाला. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली. जानेवारी महिन्यात भामरागड तालुक्यातील काँग्रेस नेते बहादुरशहा अलाम यांची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा नक्षलवादी गटाने डोके पुन्हा वर काढल्याचे बोलले जात आहे.
First Published: Saturday, April 14, 2012, 16:28