Last Updated: Friday, April 20, 2012, 14:29
www.24taas.com, चंद्रपूर 
राज्यात उन्हाच्या झळा दिवसेंदिवस अधिक वाढत आहेत. त्यातच चंद्रपूर शहराची तर देशातल्या सर्वात उष्ण शहराकडे वाटचाल होते आहे. आधीच पाणीटंचाई आणि त्यात वाढत्या तापमानाचा तडाखा यामुळे पुढचे दोन महिने कसा निभाव लागणार या काळजीनं नागरिक धास्तावले आहेत.
चंद्रपूर शहरातलं सध्या एप्रिल महिन्यात तापमान आहे ४३ अंश सेल्सियस. त्यामुळे दुपारी शहरातले रस्ते निर्मनुष्य दिसू लागले आहेत. बाहेर पडावंच लागलं तर तर कान चेहरा झाकूनच बाहेर पडावं लागतं आहे. सकाळी सर्व कामं उरकून घ्यावी लागत असल्यानं सध्या चंद्रपूर शहरातल्या नागरिकांची दैनंदिनीच बदलली आहे. या वाढत्या तापमानामागे अर्थातच काऱणे आहेत.
अनिर्बंध खाणकाम, पाण्याचा अमर्याद उपसा, बेसुमार वृक्षतोड आणि जोडीला प्रदुषण करणारे उद्योग चंद्रपूर शहराचं तापमान वाढवत आहेत. पर्यावरणाला बाधा पोहोचवणाऱ्या या गोष्टींना वेळीच आळा घातला गेला नाही तर उन्हाळ्यातले पुढचे दोन महिने शहरात राहणंही नागरिकांना असह्य होईल...
First Published: Friday, April 20, 2012, 14:29