१०००रूपयांसाठी ७वी तील मित्रांची निर्घृण हत्या - Marathi News 24taas.com

१०००रूपयांसाठी ७वी तील मित्रांची निर्घृण हत्या

www.24taas.com, नागपूर
 
एक हजार रुपये परत केले नाहीत म्हणून सातवीतल्या विद्यार्थ्यानं आपल्या मित्राचा खून केला. नागपूर जिल्ह्यातल्या खापरखेडामध्ये ही घटना घडली आहे. सातवीच्या वर्गातल्या दोघांनी नागेश्वर आंबोले याचा खून केला.
 
आणि ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा विद्रूप केला. त्यामुळं ओळख पटवण्यात अडचणी येऊ लागल्य. मात्र अंगठीवरून पोलिसांना ओळख पटवता आली. नागेश्वरन उसने घेतलेल्या एक हजार रूपयांसाठी दगडानं ठेचून त्याला मारण्यात आलं.
 
बालगुन्हेगारी प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्यानं पोलिसांपुढे मोठे आव्हान उभं राहिलं आहे. तर पुण्यात काही दिवसापूर्वी एका पंधरा वर्षी विद्यार्थ्याची हत्या त्याच्या मित्रांनी केली होती. भोसरीतील प्रियदर्शनी इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या शुभम शिर्केचे अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आली होती. ५०,०००च्या खंडणीसाठी अपहरण आणि हत्या करण्यात आली होती.
 
 
 

First Published: Saturday, April 21, 2012, 23:39


comments powered by Disqus