दुधात भेसळ, आरोग्याशी खेळ! - Marathi News 24taas.com

दुधात भेसळ, आरोग्याशी खेळ!

www.24taas.com, अखिलेश हळवे, नागपूर
 
भेसळयुक्त दूधाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरु आहे. दूधातली भेसळ ओळखण्याचे किट नागपूरातल्या एका प्रयोगशाळेत उपलब्ध आहे.
 
दूधात भेसळीचे प्रकार वाढल्यानं ही भेसळ ओळखायची कशी याबाबत काही चाचण्या करता येतात. नागपूरातल्या एका प्रयोगशाळेनं या संदर्भात एक तंत्र विकसित केलय, दूधात ठराविक रसायन मिळवलं की दूधाच्या बदलणा-या रंगावरून ही भेसळ ओळखता येते.
 
नव्यानं अस्तित्वात आलेल्या अन्न सुरक्षा कायद्यात भेसळखोरांविरुद्ध कडक कारवाईची तरतूद आहे. दहा लाखआंपर्यंत दंड आणि जन्मठेपेची तरतूद आहे.
 
दूधात भेसळ करून भेसळखोर लोकांच्या जीवाशी खेळतायत. सामान्य नागरिकांनी याबाबत जागरूक होणं गरजेचं आहे. सरकारी पातळीवर उपाय होतील त्यासाठी वाट पहात बसण्यापेक्षा याबाबत जनजागृती करायला हवी.

First Published: Sunday, April 22, 2012, 14:04


comments powered by Disqus