Last Updated: Monday, April 23, 2012, 13:41
www.24taas.com, नागपूर नागपूर विद्यापीठाचा बीकॉमचा बिझनेस लॉ या विषयाचा पेपर फुटलाय. शनिवारी या विषयाचा पेपर होता.
मात्र, शुक्रवारीच विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचं हस्तलिखित ई-मेलद्वारे मिळालं होतं. परीक्षा झाल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. हा पेपर नेमका कसा लीक झाला, याबाबत विद्यापीठाकडे उत्तर नाही. चौकशी करणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं असलं, तरी फेरपरीक्षेबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही.
दरम्यान, पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली आहे. यानंतर विद्यापीठ काय निर्यण घेते, याकडे लक्ष लागले आहे.
First Published: Monday, April 23, 2012, 13:41