शेतकरी विधवाही कापूस आंदोलनात - Marathi News 24taas.com

शेतकरी विधवाही कापूस आंदोलनात

झी २४ तास वेब टीम, यवतमाळ
 
यवतमाळच्या केळापूरमध्ये विदर्भातल्या शेतकरी विधवा रस्त्यावर उतरल्या होत्या. राहुल गांधींनी भेट घेतलेल्या कलावती आणि केबीसीतील विजेत्या अपर्णा मालेकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी विधवांनी रस्त्यावर उतरत कापूस दरवाढीच्या प्रश्नाचा निषेध केला. कापसाला ६००० रुपये हमीभाव मिळावा या मागणीसाठी राज्यभर आंदोलन पेटलंय आणि त्यात आता शेतकऱ्यांच्या विधवांनी यवतमाळच्या केळापूर तहसील कार्यालयासमोर उपोषण सत्याग्रह केला.विदर्भ जनआंदोलन समितीने या आंदोलनाचं आयोजन केलं होतं.

First Published: Friday, November 25, 2011, 10:11


comments powered by Disqus