Last Updated: Friday, April 27, 2012, 17:44
www.24taas.com, चंद्रपूर 
चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिंदेवाही तालुक्यातल्या घनदाट जंगलाचा परिसर असलेल्या पळसगाव वन परिक्षेत्रात गुरूवारी संध्याकाळी एक पट्टीदार वाघ मृतावस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली आहे.
इतकंच नव्हे तर या वाघापासून काही अंतरावरच आणखी एक वाघ जिवंत अवस्थेत सापळ्यात अडकलेला आढळला त्यामुळे या परिसरात वाघांच्या शिकारीचा प्रयत्न झाल्याचा संशय बळावला आहे.
वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून कसून तपास सुरु आहे. तर सापळ्यात अडकलेल्या वाघाला सोडवण्यात आलं असून त्याला प्रथमोपचार देण्यात आले आहेत त्याला ताडोबातल्या विशेष उपचार कुटीत रवाना कऱण्यात आलं आहे.
First Published: Friday, April 27, 2012, 17:44