Last Updated: Sunday, April 29, 2012, 19:27
www.24taas.com, चंद्रपूर 
भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात चंद्रपुरात शिवसेनेनं भाजपलाच धक्का दिला आहे. चंद्रपूर महापालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेनं काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.
आणि भाजपनं नाशिकमध्ये मनसेला पाठिंबा देत जे केलं, त्याचा बदला घेतला जाणार आहे. त्यामुळे चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर तर शिवसेनेचा उपमहापौर होणार आहे. उद्या ही निव़डणूक होते आहे. त्यामुळे मनसेला पाठिंबा देणं हे भाजपला चागलंच महागात पडलं आहे.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने अनपेक्षितपणे मुसंडी मारली होती. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना मात्र चांगलाच धक्का बसला होता. मुनगंटीवार यांच्या चंद्रपूरमध्ये भाजपला अपेक्षित असं यश मिळत नाही. त्यामुळे आता काँग्रेसचं आपला महापौर चंद्रपूरमध्ये बसवणार आहे.
First Published: Sunday, April 29, 2012, 19:27