चंद्रपुरात काँग्रेसला सेनेचा 'हात' - Marathi News 24taas.com

चंद्रपुरात काँग्रेसला सेनेचा 'हात'

www.24taas.com, चंद्रपूर 
 
चंद्रपूर महापालिकेच्या महापौरपदाची निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्यावर काँग्रेसच्या उमेदवारानं भाजपचा दणदणीत पराभव केलाय. काँग्रेसच्या संगीता अमृतकर यांनी भाजपच्या सुषमा नागोसे यांच्यावर २२ मतांनी मात केलीय. या निकालामुळं भाजप प्रदेशाध्यक्ष मुनगंटीवार यांना धक्का बसला आहे.
 
 
निवडणुकीपूर्वीच शिवसेनेनं मुनगंटीवारांना धक्का देत काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला होता.  नाशिकचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेनं काँग्रेसला पाठिंबा दिल्याचं बोललं जातय.  जागावाटपावेळी सेना भाजपच्या स्थानिक नेत्यांनी घेतलेल्या ताठर भूमिकेमुळं युती होऊ शकली नव्हती. त्यनंतर नाशिकमध्ये भाजपनं महापौरपदासाठी मनसेला दिलेल्या पाठिंब्याचा सेना वचपा काढणार हे बोललं जात होते आणि ते खरही ठरले.
 
 
गेल्यावेळी चंद्रपूर नगरपालिकेत काँग्रेस आणि भाजप सत्तेत होते. तर  शिवसेनेनं विरोधी बाकावर बसणं पसंत केलं होत. पण यावेळेला महापालिका निवडणुकीवेळी नाशिकमधला वचपा काढण्यासाठी शिवसेनेनं लागलीच काँग्रेससोबत युती करत भाजपला दणका दिलाय. चंद्रपुरची निवडणुक सुधीर मुनगंटीवारांनी प्रतिष्ठेची केली होती.

First Published: Monday, April 30, 2012, 12:47


comments powered by Disqus