प्राण्यांसाठी पाण्याचे फवारे - Marathi News 24taas.com

प्राण्यांसाठी पाण्याचे फवारे

www.24taas.com, नागपूर
 
वाढत्या उन्हाचा झळ सामान्यांप्रमाणे मुक्या जनावरांनाही बसते. त्यामुळं दिवसेंदिवस संख्या कमी होणाऱ्या प्राण्यांची काळजी घेणं गरजेचं झालंय. यासाठी नागपुरात एक विशेष सोय करण्यात आलीय.
 
सूर्यनारायण आता चांगलाच तळपतोय. विदर्भात तर अंगाची लाही लाही करणा-या तपमानामुळं आजारी पडण्याच्या आणि उष्माघाताने मृत्यू होण्याच्या घटनेत वाढ होतेय. त्याची झळ मुक्या प्राण्यांना बसू नये यासाठी महाराजबाग प्राणी प्राणीसंग्रहालयात पाण्याचे फवारे आणि वॉटरकुलरही इथं लावण्यात आलेत. इतकंच नाहीतर त्यांच्या खाण्यातून औषधं देण्यापर्यंत प्राण्यांची निगा राखली जातेय.
 
प्राणीसंग्रहालयात अशाप्रकारे प्राण्यांची सोय करण्यात आल्यानं पर्यटकांनीही समाधान व्यक्त केलंय. उन्हाचा त्रास तुम्हां-आम्हाप्रमाणे मुक्या प्राण्यांनाही होतो.त्यामुळं त्यांच्यासाठी या दिवसांत पाण्याची तरी सोय आपण प्रत्येकानं केली पाहिजे. झी २४ तासनंही एक घास पक्ष्यांसाठी ही विशेष मोहीम राबवली. त्यामुळं या मुक्या जीवांसाठी नागपुरातल्या महाराज बाग प्राणीसंग्रहालयानं केलेला उपक्रम कौतुकास्पद म्हणावा लागेल.

First Published: Tuesday, May 1, 2012, 08:50


comments powered by Disqus