तलावात बुडून दोघांचा मृत्यू - Marathi News 24taas.com

तलावात बुडून दोघांचा मृत्यू

www.24taas.com, बुलढाणा
 
बुलढाणा जिल्ह्यातील वरवंड इथं 2 सख्ख्या बहिणींचा तलावात बुडून मृत्यू झालाय. त्यातील एक जण विवाहित आहे.
 
सय्यद तोलू यांची २७ वर्षांची मुलगी निलोफर बीशे अहेमद आणि तिची १७ वर्षाची बहिण शाहीन परवीन सय्यद तोलू या दोघीही कपडे धुण्यासाठी गावालगत असलेल्या तलावावर गेल्या होत्या. यावेळी एकीचा पाय घसरुन ती पाण्यात बुडू लागली. तिला वाजविण्यासाठी दुसरी बहिण तलावात उतरली.
 
दोघीही बहिणी गंटागळ्या खाऊ लागल्या. परिसरात शेतात काम करणाऱ्या लोकांनी दोघी बहिणींना पाण्याबाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं. तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

First Published: Tuesday, May 1, 2012, 16:14


comments powered by Disqus