कारखान्याला आग, १ कोटीचे नुकसान - Marathi News 24taas.com

कारखान्याला आग, १ कोटीचे नुकसान

www.24taas.com, अकोला
 
अकोला जिल्ह्यातल्या विझोरा येथील पृथ्वी पैनल या प्लायवूड कारखान्याला भीषण आग लागून लाखोंची मालमत्ता खाक झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार पहाटेच्या सुमारास कारखान्यात एका स्फोटाचा आवाज आला.
 
या  स्फोटामुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनीष सेठी यांच्या मालकीचा हा कारखाना आहे. या कारखान्यात प्लायवूड शिट्स तयार करण्याचा  उद्योग आहे. या आगीत प्लायवूड शिट्स आणि इतर साहित्य खाक झालं आहे. आग विझवण्यासाठी अकोल्यासह,खामगाव, मुर्तीजापूर, अमरावती,पारस आणि अकोट येथील अग्निशमन विभागाचे बंब मागवण्यात आलेत.
 
आतापर्यंत आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवळपास ६० बंब लागले आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आलं आहे मात्र  या आगीत एक कोटींपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येतो आहे. २००७ मध्येही या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत कोट्यावधींचे नुकसान झालं होतं.
 
 
 

First Published: Wednesday, May 2, 2012, 12:50


comments powered by Disqus