११ वर्षांच्या नातावावर आजोबांनी केला हल्ला - Marathi News 24taas.com

११ वर्षांच्या नातावावर आजोबांनी केला हल्ला

www.24taas.com, चंद्रपूर
 
चंद्रपुरातल्या एक भयंकर घटना घडली आहे. शेतजमिनीच्या वादातून आजोबांनी आपल्या ११ वर्षांच्या नातवावरच कुऱ्हाडीने हल्ला केला. मुल तालुक्यातल्या येजगाव इथं ही घटना घडली आहे. सोयाम या परिवाराची गावालगत ५ एकर शेती आहे. सुमारे २ वर्षांपूर्वी बाबाजी आणि केशव या २ भावांमध्ये या शेतजमिनीच्या मालकीवरून मोठा वाद झाला.
 
तंटा मुक्त समितीच्या माध्यमातून शेतीची समान वाटणी करत ईश्वरचिठ्ठी द्वारे निर्णय झाला. मात्र  डोंगराळ भागाची नापीक शेती आल्याचं आरोपी केशव याला सलत होतं. याचा बदला  घेण्यासाठी आजोबांनी विशालच्या डोक्यात कुऱ्हाडीचा वार केला. वार एवढा जबरदस्त होता की कुऱ्हाड लहानग्या विशालच्या डोक्यातच फसली.
 
ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात येताच संतापलेल्या ग्रामस्थांनी आरोपी आणि त्याच्या पत्नीला बेदम मारहाण करून झाडाला बांधून ठेवलं. त्यानंतर गंभीर अवस्थेतील विशालला नागपूरच्या मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आलं.याची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने गावात दाखल झाले आणि आरोपीला अटक करण्यात आली.
 
 
 
 
 

First Published: Thursday, May 3, 2012, 17:49


comments powered by Disqus