नक्षलवाद्यांनी केली दोन गावक-यांची हत्या - Marathi News 24taas.com

नक्षलवाद्यांनी केली दोन गावक-यांची हत्या

www.24taas.com, सिंदेसूर
 
गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा तालुक्यातल्या सिंदेसूर गावात नक्षलवाद्यांनी दोन गावक-यांची हत्या केली आहे. गडचिरोलील जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा पुन्हा धुमाकूळ सुरू असल्याचे दिसून आले आहे.
 
राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी नक्षल हल्ल्याबाबत वक्तव्य केले होते. काही जण अफवा पसरविण्याचे काम करीत  असल्याचे म्हटले होते. त्यानंतर  सिंदेसूर येथे दोघांची हत्या झाल्याने आर. आर. पाटील  यांना चपराक बसली आहे.
 
मधुकर कापगते आणि विनायक लोहबरे अशी हत्या करण्यात आलेल्यांची नावं आहेत. पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी हे हत्याकांड घडवून आणलं. नक्षलवाद्यांनी सकाळी गावात घुसून हे हत्याकांड घडवलं. गावक-यांच्यासमोर या दोघांची गळा कापून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. राज्याचे गृहमंत्री  आर.आर.पाटील  हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी नक्षलवाद उखडून टाकण्याची घोषणा केली होती. तसेत पोलीस अधिकाऱ्यांना तंबीही दिली होती. मात्र, नक्षली कारवाया सुरू असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

First Published: Friday, May 4, 2012, 12:12


comments powered by Disqus