नागपूर विमानतळावर प्राण्यांचे लॅंडींग - Marathi News 24taas.com

नागपूर विमानतळावर प्राण्यांचे लॅंडींग

www.24taas.com, नागपूर
 
 
नागपूर विमानतळाच्या धावपट्टीवर मोठ्या प्रमाणात पक्षी आणि बेवारस प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे तिथं मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या क्षेत्रातल्या जाणकारांनी हा अतिशय घातक प्रकार असल्याचे म्हटले आहे.
 
 
मोरांचा हा थवा पाहिल्यावर हे पक्ष्यांचं अभयारण्य वाटेल. तर ही भटकी कुत्री आणि डुकरं पाहिल्यावर जणू हा शहरातला रहिवासी भाग असल्याचं कुणीही म्हणेल. मात्र हा आहे, नागपूरातला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा परिसर. तरीही विमानतळ प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
 
आकाशात उड्डाण घेताना विमानाचा वेग जास्त असतो. अशा वेळी प्राण्यांची धडक बसल्यास विमानात तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता असते. तर विमानतळ प्राधिकरणाच्या अधिका-यांनीही प्राण्यांचा शिरकाव होत असल्याचं मान्य केलंय. हा प्रकार थांबवण्यासाठी सोलर कुंपण उभारणार असल्याचं त्यांनी सांगितलं. धावपट्टीवर प्राणी येण्याच्या घटनेमुळे हे विमानतळ नेहमीच बातमीच्या झोतात राहिला आहे.
 
 
व्हिडिओ पाहा
 

First Published: Wednesday, May 9, 2012, 12:49


comments powered by Disqus