Last Updated: Thursday, May 10, 2012, 12:48
www.24taas.com, नागपूर 
नागपूर शहरातल्या भारतनगरमध्ये काल दगडानं ठेचून संतप्त जमावानं तिघा जणांचा जीव घेतला होता. यासंबंधी धक्कादायक खुलासा स्थानिकांनी केला आहे. गेल्या काही काळापासून सातत्यानं होणाऱ्या त्रासासंबंधी पोलिसांनी कधीच दखल घेतली नसल्यातून हे तिहेरी हत्याकांड घडल्याचं परिसरातील रहिवाशांनी सांगितलं.
चोरी आणि महिलांची छेड काढण्यासारख्या घटना घडल्या असून तक्रार करूनही त्याबाबत पोलिसांनी काहीच कारवाई केली नसल्यातून हा प्रकार घडल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. पोलिसांकडूनही फारशी दखल घेतली जात नसल्यानं या भागातल्या रहिवाशांनी रात्रीची गस्तही सुरु केली होती.
चोरट्यांची दहशत, पोलिसांचं दुर्लक्ष त्यामुळं दिवसभर काम करुन रात्रीचा करावा लागणारा पहारा, यातून संतप्त नागरिकांचा असा उद्रेक झाला. या उद्रेकात तिघांना नाहक आपल्या प्राणाला मुकावं लागलं. आता याप्रकरणी कारवाई होईलही मात्र या तिघांच्या मृत्यूला जबाबदार कोण हा प्रश्न अनुत्तरीतच राहील.
First Published: Thursday, May 10, 2012, 12:48