'बडे मियाँ, छोटे मियाँ' अटक! - Marathi News 24taas.com

'बडे मियाँ, छोटे मियाँ' अटक!

झी २४ तास वेब टीम, नागपूर
 
नागपूर पोलिसांनी अशा एका दुकलीला गजाआड केलंय, ज्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या नाकी नऊ आणले होते.विशेष म्हणजे या चोरांच्या टोळीवर पोलीस नजर ठेऊन होते. मात्र ही टोळी पोलिसांच्या हाती लागत नव्हती.
 
या टोळीने चोरी कऱण्यासाठी एक अफलातून शक्कल शोधून काढली होती. लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने चोरी कऱणारी ही श्रीमंत चोरांची टोळी अखेर गजाआड झालीच. नागपूर पोलिसांनी या संजय ठोणे,आणि अविनाश राठोडला मोठ्या शिताफिन अटक केली आहे. अटक दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून या दोघांवर देश भरातील विविध पोलिस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या दोघांनी चोरी करण्यासाठी वेगळीच शक्कल लढवली होती. चोरी करण्यासाठी हि टोळी रात्रीच्या वेळी महामार्गावर दाखल होत होती. महामार्गावर येऊन हे दोघे महामार्गावरुन माल वाहणाऱ्या ट्रकला लिफ्ट मागण्याच्या बहाण्यान थांबवायचे ट्रक थांबल्या नंतर हे दोघे त्या ट्रकमध्ये काही दूरपर्यंत प्रवास करयचे. ट्रक गावाबाहेर आल्या नंतर हे दोघे त्या ट्रकचालकाला मारहाण करुन बेशुद्ध करत असे. त्या नंतर ही टोळी त्या ट्रक ड्रायव्हरला रस्त्याकडेला फेकून देत. त्यानंतर हे दोघे ट्रकमधील माल त्यांच्या ठरलेल्या व्यक्ती विकत असे. त्यानंतर हे दोघे ट्रक घेऊन त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी पोहचत होते. या ठिकाणी त्यांचे इतर साथीदार त्यांची वाट पहात राहायचे. ठरल्या ठिकाणी पोहचल्यानंतर या टोळीतील इतर साथीदार ट्रकमधील सामानाची अदलाबदली करायचे.
 
चोरलेल्या ट्रकचा चेचिस नंबर बदलवून ही टोळी त्या ट्रकला विकत असे आणि विशेष म्हणजे हि टोळी चेचिस नंबर सोबत इंजन नंबर सुद्धा बदलत होते. हिच शक्कल वापरत या टोळीने आत्तापर्यंत ४० ट्रक आणि मोठ्या प्रमाणात मोटर सायकल चोरल्या होत्या. चोरलेल्या ट्रकवरील चेचिस नंबर आणि ईंजन नंबर बदल्यावर हि टोळी त्या गाड्याना छत्तीस गढ,हरीयाना,कर्नाटक या राज्यांत नोंदणी करुन या वाहनांची विक्री करत होते. गेल्या कित्त्येक दिवसांपासून ही टोळी अशाच पध्दतीने राजरोसपणे हा काळा धंदा करत होती. मात्र त्यांच्या ह्या काळ्या धंद्याची खबर नागपूर पोलिसांना लागली आणि या टोळीचा पर्दाफाश झाला.
 

पोलिसांनी या टोळी कडून चोरीचे तब्बल ४० ट्रक आणि ५० मोटरसायकल जप्त केली आहे. पोलीस अटक केलेल्या आरोपींची चौकशी करुन त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहे.
 

First Published: Tuesday, November 29, 2011, 13:27


comments powered by Disqus